Vishwakarma Scheme: 77व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना कारागीरांसाठी 'विश्वकर्मा योजना' जाहीर केली. मोदी मंत्रिमंडळाने बुधवारी या योजनेला मंजुरी दिली आहे.
ही योजना विशिष्ट शैलीतील कुशल कामगारांसाठी असेल.
तिचे पूर्ण नाव PM 'विश्वकर्मा कौशल सन्मान योजना' किंवा 'PM विकास योजना' (PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना - PM VIKAS) आहे. या योजनेचे बजेट 2023 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात ठेवण्यात आले होते.
'विश्वकर्मा योजने'मध्ये 13 ते 15 हजार कोटी रुपयांचीगुंतवणूकहोणार आहे. विश्वकर्मा योजनेंतर्गत कमाल 5% व्याजासह 1 लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा पूजेच्या निमित्ताने 'विश्वकर्मा योजना' सुरू करण्यात येणार आहे. हाच दिवस पंतप्रधाननरेंद्र मोदीयांचाही वाढदिवस आहे.